स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Tuesday, January 24, 2006

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर ही एक अतिशय प्रसिद्ध कथामाला...मी अशातच पहिली ३ पुस्तकं वाचली...
प्रत्येक शाळकरी मुलाला आपण हॅरी पॉटर असावं असं वाटंलं नाही तर नवल.
मलाही माझे बालपण आठवले आणि अगदी पोटधरून हसू आले.
जादू, चमत्कार या गोष्टींबद्दल मला खूप चिकित्सा होती...आणि मल कितिदातरी असं वाटायचं की माझ्या आयुष्यातही जादू हॊऊ शकते...कित्येकदा माझ्या दिवास्वप्नांमध्ये मला असं वाटायचं की मी सकाळी झोपेतून उठून आरशात बघते तर काय मी गोरी झालेली, एकदम सुंदर, माझे केस एकदम सरळ,लांबसडक आणि काळेशार.
कितिदा तरी मला असं वाटयचं की मी असामान्य आहे...अगदी कॄष्णाचा कलियुगातील अवतार आहे वगैरे. :)
हॅरी पॉटर या काल्पनिक पात्राबद्दल अशा गोष्टी वाचताना खूप खूप मज्जा येते, त्याची शाळा, जिवाभावाचे मित्रं, सगळ्यांनी सहजपणे स्वीकारलेलं त्याचं असामान्यत्व (अगदी त्याने स्वत:नेसुद्धा) आणि ह्या सगळ्यांना गुंफून रचलेल्या अतिरंजित रहस्यकथा.
लेखिकेचे लेखनकौशल्य पाहून थक्क होऊन गेले मी..खूपच सुंदर!

4 Comments:

  • At 10:27 PM, Blogger Parikshit said…

    Everyone of us would like to have magic in our lives. may be Harry Potter describes it best. Unfortunately I couldn't enjoy the story (at least in cinema) may be because I am over-matured ;(

     
  • At 2:19 AM, Blogger Hrishi Diwan said…

    pahilach marathi blog wachla aaj - khoop chaan watla. Harry Potter majhya sarwat awadtya malikenpaiki aahe... me mhanen ki sagli pustaka waach ani ya parikshit namak thombya saarkhi ugich khoti khoti "motthi" hou nakos :)

    PS: Marathit wichar karun, askhalit marathit (?) pratikriya lihine he jikiriche aahe :)

     
  • At 2:45 AM, Blogger kiran said…

    i always wondered ki Parikshitcha marathi itaka changala kasa ahe...now i don't. :)
    jikiricha ahe kadachit pan marathi lihinyat tehi devanagari lipimadhe kahi vegalich majja ahe.
    hmmn, lavkarach pudhache 3 volumes vachnaar ahe.

     
  • At 10:35 AM, Blogger Sumedha said…

    हॅरी पॉटर हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे तू हे नोंद करून बरेच दिवस झाले असले तरी प्रतिक्रिया लिहायचा मोह आहे!
    एकदा का "जादू" ही कल्पना आपण स्वीकारली, की बाकीच्या सगळ्या गोष्टी खूपच सुसंगत वाटतात. प्रत्येका गोष्टीला, घटनेला कारण आणि परिणाम आहेत. आणि ते ज्या तर्‍हेने उलगडत जातात, त्यात पुस्तकाची सगळी "जादू" आहे! मग अतिरंजित असं काही वाटतच नाही.

    पुढची 3 पुस्तकं वाचून झाली की नाही ;-)

    तुझा ब्लॉग खूप आवडला. लिहीत रहा!

     

Post a Comment

<< Home