कोणाच्या आयुष्यातील आचार-विचार, आनंद-दु:ख आपल्यावर अवलंबून आहेत या जाणीवेइतकं दुसरं मोठं ओझं कोणतं? अर्थात ही तुम्ही स्वत:हून करून घेतलेली समजूत असेल तर गोष्टं वेगळी. पण त्याव्यक्तीने सहवासातल्या प्रत्येकक्षणी जर तीच जाणीव करून दिली तर किती तिटकारा येत असेल?
अशा व्यक्तीसोबत रहाताना तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देणं किती महत्वाचं आहे हे सगळं भोगणाऱ्यापेक्षा कोणाला जास्त तीव्रतेने कळेल? सतत सतत प्रयत्न करूनही तिचा स्वाभिमान बाहेर येत नाही यातली निराशाही खूपच असणार. पण हे सगळं झेलत असताना आणि परिस्थिती सुधारायचा आटोकाट प्रयत्न करत असताना स्वत:च्या आयुष्यातच जर अस्थिरता निर्माण होत असेल ; आपण पोखरल्या जातो आहे याची जाणीव मनात डोकावत असेल आणि आयुष्याच्या आधारस्तंभांवरही आक्रमण होतंय, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात आवडीच्या आणि जपलेल्या गोष्टी हिरावून घेण्याचा नकळत प्रयत्न होतो आहे असं वाटायला लागलं आणि या सगळ्या भावनांपेक्षाही जर तुमच्या आयुष्यात अवास्तव हस्तक्षेप होत असेल तर पायात रूतणाऱ्या काट्याला काढून फेकाल तसंच जर तुम्ही ते नातंही आयुष्यातून काढून टाकलं तर चुकलं कुठे? ( हा रूपक, उपमा किंवा अशाच कुठल्यातरी अर्थालंकाराचा प्रयोग चुकीचा आहे. कारण नाती म्हणजे काटे नव्हेत. बिघडलेली नाती सलणाऱ्या काट्यांपेक्षाही जास्त बोचतात, घायाळ करतात आणि तरीही ती इतकी सहज आयुष्यातून काढून नाही टाकता येत, वर्षानुवर्षे सलतच राहतात.) आणि याहीनंतर जर "तू माझं स्वतंत्र अस्तित्व कधीच लक्षात घेतलं नाहीस" अशी वाक्यं ऐकायला मिळाली तर नि:स्वार्थीपणे दाखवलेल्या चांगुलपणावर विश्वास राहील कोणाचा?

6 Comments:
At 12:41 AM,
Anonymous said…
thoda bhaari bhi...par ek dum sahi hein
At 5:59 AM,
Anonymous said…
that was a bouns to me..
Actually could not get what you wanted to Comvey...
At 9:48 AM,
Anonymous said…
I got it!
या परिस्थितीचं, वेदनेचं इतकं नेमकं वर्णन फक्त त्यातून जाणारा किंवा त्यातून जाणार्याला अगदी जवळून बघणाराच करू शकतो, समजू शकतो. त्याला मी सहानुभूती शिवाय दुसरं काही देउ शकत नाही!
आणि तुझ्या प्रश्नाचं (तुम्ही ते नातंही आयुष्यातून काढून टाकलं तर चुकलं कुठे?) उत्तर द्यायचं म्हणलं तर मी हा प्रतिप्रश्न करीन. ते नातं काढून टाकल्यानं ती दुसरी व्यक्ती उन्मळून पडेल ही भयंकर जाणीव ती "चूक" करण्यापासून परावृत्त करत असेल तर?
At 3:27 PM,
Anand said…
hmmm....avadla mala he..
--Anand--
At 6:00 AM,
kedar said…
Are sahi lihile ahes !! Mast ekdum!
At 8:00 PM,
kiran said…
anonymous, i did not get what u got. :(
ती व्यक्ती उन्मळून पडेल फक्त या एकाच कारणामुळे ते जर इतके वर्ष रखडत असेल तर?
आणि स्वत:च्या आयुष्याबद्दल विचार करून त्याला पूरक अशा क्रुतीला आपण जर "चूक" म्हणत असाल तर पुढे बोलायलाच नको.
Post a Comment
<< Home