स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Friday, November 17, 2006

रुग्णवाहिका आणि रहदारी

सकाळची वेळ.
बेंगलोर शहरातला एक गजबजलेला रस्ता, छोटासा, डिवायडर नसलेला पण दुपदरी.
दोन्ही बाजूने गाड्यांची जीवघेणी कसरत चाललेली, रहदारीतून वाट काढण्याची.
प्रत्येकालाच ऑफ़िसला पोहोचायची घाई झालेली आणि प्रत्येकाच्या मनातही कदाचित तेच विचार.
अशात एक अगदी ओळखीचा आवाज हळू हळू मोठा होत होत आपल्या कानावर पडतो.
आपण आवाजाच्या दिशेने पाहतो आणि मनात धस्स होते, इतक्या ट्राफ़िक मधून ही रुग्णवाहिका कशी वाट काढणार हा विचार करुन खूप वाइट वाटते.
माझा जीव खालीवर होत असतो आणि अशा वेळेला आपण काहीच करु नाही शकत तिला वाट करुन देण्यासाठी ही खंत जाणवते मनात.
आणि मी परत तिच्या दिशेने पाहते तर काय रुग्णवाहिकेचा ड्रायवर त्याचे सगळे स्किल्स पणाला लावून पुढे जायचा प्रयत्न करत आहे, आणि दुसऱ्या दिशेने येणारी एक कार त्याच्या रस्त्यात आली आहे, त्या कारच्या ड्रायवरने पण रुग्णवाहिकेला न जुमानता पुढे जायची मरमर केलेली दिसते.
क्षणात एकदम जगातल्या माणुसकीचा ह्रास झाला की काय असं वाटायला लागतं.
आपण आपल्या स्वत:च्या प्रायॉरिटिजना इतकं अवास्तव महत्व देऊन जगतो की समोर एक माणुस कदाचित त्याच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत आहे, त्याला तत्पर मदतीची गरज आहे हे कसं विसरल्या जाऊ शकतं? कोणाकडूनही...
आणि आयुष्यात सगळ्यात मोठी गम्मत ही आहे की आज त्या माणसाबद्दल काडीचीही सहानुभुति न दाखवणारे तुम्ही पुढच्याच क्षणी त्याच्या अवस्थेत असू शकता...

4 Comments:

  • At 5:25 PM, Blogger kedar said…

    Hey Kiran, Hmmm.. barobar aaahe dhak-dhukichya jivnaat sahanubhuti ha shabdch almost harvalay.. well written :)

     
  • At 6:40 PM, Anonymous Anonymous said…

    Good one!!
    He chote chote prasanga ani tyala aplya manane dileli emotional backgound/context - this makes an interesting read!

     
  • At 11:07 PM, Blogger kiran said…

    Thanks Parag ani Kedar!

     
  • At 8:46 AM, Blogger स्वाती आंबोळे said…

    किरण,

    माझ्या चारोळीवरच्या प्रतिक्रियेसाठी मनापासून (नाहीतर कसे असतात म्हणे?) धन्यवाद. :)
    त्या निमित्ताने तुमचा ब्लॉग वाचायला मिळाला, म्हणून त्याहून जास्त धन्यवाद. छान लिहीता. तुम्हाला भेटून आनंद झाला. :)

     

Post a Comment

<< Home